धाराशिव : दि.23 मे 2026 रोजी पोलीस ठाणे येरमाळा हद्दीत पहाटे हायवेवरून जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी मेंढ्या चोरी करून नेल्याची घटना घडली होती. या घटनेची गंभीर दखल घेत मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. घटनेचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, RCP पथक क्र.1 आणि QRT पथक रवाना करण्यात आले. पोलीस पथक पोलीस ठाणे येरमाळा हद्दीतील हायवेवरील ब्रीज परिसरात तपास करत असताना गोपनीय माहितीदारामार्फत माहिती मिळाली की, तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढी आणि उमरा पारधी पिढी येथील काही इसमांनी पहाटे चालत्या ट्रकमधून मेंढ्या चोरी करून आणल्या असून त्या उमरा पिढीजवळील बाभळीच्या झाडाखाली उभ्या असलेल्या लाल रंगाच्या टमटममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एका बाभळीच्या झाडाखाली लाल रंगाचे टमटम उभे असून त्याजवळ 7 ते 8 इसम बसलेले दिसले. पोलिसांना पाहताच संबंधित इसम पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. त्यानंतर पोलिसांनी टमटमची तपासणी केली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या मेंढ्या आढळून आल्या. फिर्यादीला संपर्क करून मेंढ्यांचे वर्णन सांगितले असता त्या मेंढ्या त्याच्याच ट्रकमधून चोरीस गेलेल्या असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी चोरीतील मेंढ्या आणि टमटम असा एकूण 3 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस ठाणे येरमाळा येथे जमा केला आहे. सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. सचिन खटके, सपोनि श्री. तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, मपोहे शोभा बांगर, पोना संतोष तिघाडे, संदीप चौघुले, रोहित दंडनाईक तसेच RCP पथक क्र.1 व QRT पथक यांनी पार पाडली.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.