धाराशिव : दि. २१ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यातील मालमत्तेविषयीचे गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. सपोनि अमोल मोरे, पोह/बळीराम शिंदे, अमोल चव्हाण व चालक पोकॉ दहीहांडे हे येडशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इनोव्हा कार क्रमांक MH 15 BX 6820 मधून अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचून संबंधित वाहन थांबवले. वाहन चालकास नाव विचारले असता त्याने आपले नाव सुभाष भिमराव उर्फ लाला काळे (वय ३३, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब, जि. धाराशिव) असे सांगितले. वाहनातील दुसऱ्या व्यक्तीने आपले नाव दादा रामा काळे (वय ४६, रा. जुना बस डेपो, पारधी पिढी, धाराशिव) असे सांगितले. पोलिसांनी वाहनाची पाहणी केली असता मागील सीटवर विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले. सदर इनोव्हा कार व विदेशी दारू असा एकूण ६ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी सुभाष भिमराव काळे व दादा रामा काळे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि अमोल मोरे, पोह/ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण व चालक पोकॉ दहीहांडे यांच्या पथकाने केली.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.