धाराशिव : दि. 22 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालमत्तेविषयक गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेत पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस ठाणे धाराशिव शहर हद्दीत कारवाई केली. यावेळी गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन इसम अंबालना हॉटेलसमोरील चौकात चोरीच्या मोटारसायकलींसह थांबले असल्याची खात्रीशीर माहिती पथकास मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी जाऊन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी आपली नावे राजेश उर्फ राजा परमेश्वर बनसोडे (वय 21, रा. साठे नगर, धाराशिव) व अतिष हनुमंत सगर (वय 22, रा. भक्ती मार्ग, सांगोला चौक झोपडपट्टी, पंढरपूर जि. सोलापूर, ह.मु. गावसूद ता. जि. धाराशिव) अशी सांगितली. पथकाने त्यांच्याकडे असलेल्या मोटारसायकलींबाबत विचारपूस केली असता दोन्ही आरोपींनी त्या चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींकडून अंदाजे 60 हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. सदर आरोपींना चोरीच्या मोटारसायकलींसह पुढील कारवाईसाठी आनंदनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, राहुल नाईकवाडी, चालक पोलीस अंमलदार दहीहंडे तसेच TAW पोलीस अंमलदार बिराजदार यांच्या पथकाने केली.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.