पंचायत समिती सदस्य, किसन बंडू देडे यांच्या वाढदिवसानिमित्त,१२ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन,

 


तुळजापूर : पंचायत समिती सदस्य तथा काक्रंबा गटाचे लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते किसन बंडू देडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. हे रक्तदान शिबिर उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.


सदर रक्तदान शिबिर मंगळवार दिनांक १२ मे २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत हनुमान मंदिर, काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव येथे पार पडणार आहे.
“तुम्ही दिलेला रक्ताचा एक थेंब तीन निष्पाप जीव वाचवू शकतो. हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट असेल,” असे आवाहन किसन बंडू देडे यांनी नागरिकांना केले आहे.
या रक्तदान शिबिरात परिसरातील युवक, नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
सहकार्य : उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर, जि. धाराशिव