सुवर्णा पाटील यांची शिवसेना महिला सेना जिल्हा संघटन प्रमुखपदी नियुक्ती; लोहारा तालुक्यात उत्साह पक्षनिष्ठेची दखल; सुवर्णा पाटील यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी
सुवर्णा पाटील यांची शिवसेना महिला सेना जिल्हा संघटन प्रमुखपदी नियुक्ती; लोहारा तालुक्यात उत्साह पक्षनिष्ठेची दखल; सुवर्णा पाटील यांच्यावर शिवसेनेची मोठी जबाबदारी.
लोहारा प्रतिनिधी : शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार कानेगाव जिल्हा परिषद सदस्या सौ. सुवर्णा सतीशराव पाटील यांची शिवसेना महिला सेना धाराशीव जिल्हा संघटन प्रमुखपदी (संपूर्ण धाराशीव जिल्हा कार्यक्षेत्र) नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रतापजी सरनाईक यांच्या हस्ते सुवर्णा पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. यावेळी युवासेना धाराशीव लोकसभा प्रमुख आनंद पाटील, सतीशजी पाटील यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
नवनियुक्त जिल्हा संघटन प्रमुख सौ. सुवर्णा पाटील म्हणाल्या, “पक्षप्रमुख आणि पालकमंत्री महोदयांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार घराघरांत पोहोचवणे हेच माझे मुख्य ध्येय असेल. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवून संपूर्ण जिल्ह्यात महिला संघटन अधिक मजबूत करू. तसेच धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मी अहोरात्र काम करेन.” दरम्यान, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती निवडीच्या वेळी सुवर्णा पाटील यांना डावलण्यात आले होते. मात्र, पक्षनिष्ठा कायम ठेवत आनंद पाटील यांनी पक्षाचे काम अधिक जोमाने सुरू ठेवले. कानेगाव मतदारसंघ आणि लोहारा तालुक्यात त्यांनी मजबूत जनसंपर्क निर्माण करत विकासकामांचा धडाका लावला आहे. आनंद पाटील यांचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री मा. प्रतापजी सरनाईक यांच्याशी असलेले जवळचे संबंध आणि राज्यपातळीवरील प्रभाव यामुळे अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. शेतकरी, महिला आणि तरुणांच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करून त्यांनी अनेक कामे मार्गी लावली आहेत. सध्या संपूर्ण धाराशीव जिल्ह्यासह विशेषतः लोहारा तालुक्यात आनंद पाटील यांच्या कार्यपद्धतीची जोरदार चर्चा होत असून, “काम थेट मंत्रालयातून मंजूर करून आणणारे नेतृत्व” अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. या वाढत्या जनविश्वासामुळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सुवर्णा पाटील यांच्या या निवडीबद्दल जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक स्तरातून आनंद व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्यावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.