महिलांच्या गळ्यातील मणिमंगळसूत्र चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात ०४ आरोपी अटकेत; ८ लाख ३८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

धाराशिव : दि. ०१ मे २०२६ रोजी पोलीस स्टेशन तुळजापूर हद्दीतील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविक महिलेच्या गळ्यातील गंठण चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस स्टेशन तुळजापूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २१०/२०२६ कलम ३०३(२) भा.न्या.सं. अन्वये अज्ञात महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तसेच अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे धाराशिव जिल्ह्यात नोंद असल्याने व सदर गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधीक्षक, धाराशिव यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्ह्यांचा तात्काळ तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने दि. १५ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुदर्शन कासार व त्यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पारगाव टोल नाका, वाशी येथे सापळा रचून ०२ महिला व ०२ पुरुष आरोपींना त्यांच्या महिंद्रा स्कॉर्पिओ वाहनासह ताब्यात घेतले.
आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी तुळजापूर व येरमाळा परिसरात भाविक महिलांच्या गळ्यातील गंठण व मणिमंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पिओ असा एकूण ८,३८,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर आरोपींकडून पोलीस स्टेशन तुळजापूर येथील ०१ व पोलीस स्टेशन येरमाळा येथील ०३ असे एकूण ०४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :
१) अनिता सुनिल शिंदे
२) हिराबाई रमेश शिंदे
३) चिरंजीव रमेश शिंदे
४) किरण शेषराव शिंदे
सर्व रा. पिंपळगाव तांडा, ता. अंबड, जि. जालना.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पोलीस स्टेशन येरमाळा यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
ही कारवाई मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधीक्षक, धाराशिव व मा. श्रीमती शफकत आमना, अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, मपोह शोभा बांगर, मपोका बहिरवाड (पोस्टे वाशी), चापोह रत्नदीप डोंगरे व नागनाथ गुरव यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.