धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कन्हेरवाडी परिसरात धडक कारवाई करत गावठी कट्ट्यासह एका आरोपीस ताब्यात घेतले असून चोरीची मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे. दि. 18 मे 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यात मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे तसेच अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी सपोनि अमोल मोरे, पोह राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, मपोह शोभा बांगर व चालक पोकॉ दहीहांडे यांचे पथक कन्हेरवाडी गावाजवळ आले असता गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रशांत उर्फ भमड्या बालाजी काळे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब व अशोक नाना पवार, रा. बावी ता. वाशी हे दोघे मोटरसायकलवरून कन्हेरवाडी पाटी येथे येणार असून त्यांच्याकडे अग्नीशस्त्र आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दुपारी सुमारे 4 वाजता कन्हेरवाडी पाटी येथे संशयितांना थांबवले. पोलिसांना पाहताच एका इसमाने गावठी कट्टा फेकून पळ काढला. तर दुसऱ्या इसमास ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अशोक नाना पवार, रा. बावी शिवार काटशिवरी पारधी पिढी, ता. वाशी ह.मु. कन्हेरवाडी ता. कळंब असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी कट्टा आढळून आला. पळून गेलेल्या इसमाचे नाव विशाल उर्फ प्रकाश उर्फ भामड्या बालाजी काळे असल्याचे आरोपीने सांगितले. तसेच आरोपीकडील मोटरसायकल बाबत चौकशी केली असता ती मोटरसायकल मुरुड, जि. लातूर येथून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. मुरुड पोलीस ठाण्यात सदर मोटरसायकल चोरीप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची खात्री करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि अमोल मोरे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, अमोल चव्हाण, शोभा बांगर व चालक दहीहांडे यांच्या पथकाने केली.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.