तामलवाडी येथील बहुचर्चित मिलन लॉज प्रकरणातील मुख्य आरोपीस माननीय जिल्हा व सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात तामलवाडी पोलीस स्टेशन येथे पिटा (PITA) कायदा तसेच भारतीय न्याय संहिता कलम 143 व 144 अंतर्गत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. धाराशिव Prevention of Immoral Traffic विभागामार्फत तामलवाडी येथील मिलन लॉजवर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईदरम्यान दोन बांगलादेशी महिला व एक महाराष्ट्रातील तरुणीकडून देहविक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती. सदर प्रकरणात मुख्य आरोपी यांच्या वतीने ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांनी न्यायालयात बाजू मांडली. आरोपीने संबंधित हॉटेल खरेदीसाठी करारनामा केला असून, इसार रक्कम देऊन दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे त्यांनी न्यायालयास सांगितले. तसेच लॉजमध्ये सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर प्रकारांची आरोपीला कोणतीही माहिती नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. याशिवाय, पोलिसांनी नमूद केलेल्या बांगलादेशी महिलांशी आरोपीचा कोणताही संबंध नसून, त्या महिलांना कोणी आणले किंवा त्या तेथे कशा आल्या याबाबत तपासात आरोपीविरुद्ध कोणताही ठोस पुरावा निष्पन्न झालेला नसल्याचे ॲड. साखरे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. “Bail is rule and jail is exception” हा महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा उपस्थित करत, केवळ आरोपांच्या आधारे आरोपीला कारागृहात ठेवणे योग्य नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माननीय जिल्हा न्यायाधीश श्री. ठुबे यांनी मुख्य आरोपी यांचा नियमित जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणात ॲड. विशाल प्रभाकर साखरे यांना ॲड. मंजुषा साखरे, ॲड. महेश लोहार, ॲड. शुभम तांबे, ॲड. अमित गोळे, ॲड. अर्चना कांबळे, ॲड. योगेश कुलकर्णी, ॲड. ओंकार कोरेगावकर, ॲड. संकेत गोरे, ॲड. रोहित लोमटे व ॲड. पृथ्वीराज खोचरे यांनी सहकार्य केले.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.