लग्नाचे आमिष दाखवून तरुणीकडे लैंगिक अत्याचार; नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

 


नळदुर्ग प्रतिनिधी : एका 21 वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून दीर्घकाळ लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी (नाव व गाव गोपनीय) हिच्यावर माहे ऑक्टोबर 2022 पासून ते दि. 01 एप्रिल 2026 पर्यंत एका तरुणाने लग्नाचे आश्वासन देत वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर लग्न करण्यास नकार देऊन तिची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, “कोणास काही सांगितले तर तुला व तुझ्या आई-भावाला जिवे ठार मारू,” अशी धमकी देण्यात आली. आरोपीच्या नातेवाईकांनीही पीडितेस मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पीडितेने दि. 15 मे 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 69, 318(4), 351(2) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.