तीर्थ बुद्रुकच्या महाराष्ट्र विद्यालयाचे दहावी परीक्षेत घवघवीत यश



तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथील महाराष्ट्र विद्यालयाने मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयाचा एकूण निकाल ९२.५९ टक्के लागला असून सर्व विद्यार्थी अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
पृथ्वीराज श्रीकांत शिंदे – ८७.४०%
सागर शाहुराज माने – ८७.२०%
रेणुका किशोर माडजे – ८६%
प्राची अनंत माझे – ८३.८०%
सौदागर बालाजी ढेरे – ८१%
वैष्णवी ज्ञानेश्वर नावडे – ८०.८०%
आर्य लक्ष्मण लोहार – ८०%
ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळवले आहे. मराठी माध्यमाच्या ग्रामीण शाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा शिक्षकांच्या कर्तृत्वातून कायम राखली जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा अधोरेखित झाले आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल गावकरी, पालक आणि परिसरातून शिक्षक व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.