कामगार मंत्र्यांनी घेतले आई तुळजाभवानीचे दर्शन; भाजप व मंदिर समितीकडून सत्कार

तुळजापूर : महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री यांनी आज श्रीक्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे मनोभावे दर्शन घेऊन देवीचे आशीर्वाद घेतले.
यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रदेश कार्यकारिणी सदस्य गुलचंद भाऊ व्यवहारे आणि सागर पारडे यांनी कामगार मंत्र्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
त्यानंतर दर्शन पूर्ण झाल्यानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान समितीच्या वतीनेही कामगार मंत्र्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, मंदिर संस्थानचे अधिकारी व कर्मचारी तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.