धारुर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी


धारुर गावात साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करून करण्यात आली.
यावेळी गावचे पोलीस पाटील सुनील शिंदे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, बेंबळी पोलीस स्टेशनचे बिट अंमलदार पवार साहेब, तसेच महाराष्ट्र बिगर शेतकरी मजूर सेनेचे संस्थापक अध्यक्ष नागनाथ कांबळे, व गावातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि समतेच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याला अभिवादन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.