तुळजापूर प्रतिनिधी : गुरुतत्त्व प्रदीप परिवाराच्या वतीने श्रीक्षेत्र तुळजापूर येथे दि. ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत होणाऱ्या श्री दत्त दुर्गा महानुष्ठानम् सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी श्री शक्तिपीठ जोगवा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. विश्वशांती, विश्वकल्याण, विश्वहित आणि सुसंस्कृत समाजनिर्मितीचा संकल्प घेऊन ही यात्रा दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी श्रीक्षेत्र तुळजापूर येथून प्रारंभ होणार असून दि. ११ सप्टेंबर २०२६ रोजी पुन्हा श्रीक्षेत्र तुळजापूर येथे सांगता होणार आहे. या यात्रेत आई तुळजाभवानीची मूर्ती, जोगव्याची परडी आणि भगवान श्रीदत्तप्रभूंच्या पादुका भाविकांच्या दर्शनासाठी असतील. प्रत्येक ठिकाणी भवानी पूजन, परडी पूजन, जोगवा गोंधळ पदे, नामस्मरण, गुरुतत्त्व जागरण तसेच जोगवा संकलनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. भाविकांना गहू, तांदूळ, डाळ, खाद्यतेल, तूप किंवा रोख स्वरूपात जोगवा अर्पण करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकलित होणारा जोगवा श्रीक्षेत्र तुळजापूर येथे होणाऱ्या श्री दत्त दुर्गा महानुष्ठानम्, महायज्ञ, महाप्रसाद अन्नदान आणि विविध सेवाकार्यासाठी वापरण्यात येणार आहे. महानुष्ठानामध्ये १००८ श्री गुरुचरित्र सारामृत पारायणे, श्री गुरुचरित्र कथामृत, पंचकुंडात्मक सहस्त्रचंडी याग, अन्नदान, महाप्रसाद तसेच विविध धार्मिक उपक्रम संपन्न होणार असून हजारो भाविक या दिव्य सोहळ्यात सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ही यात्रा केवळ जोगवा संकलनापुरती मर्यादित नसून गुरुतत्त्वाचा जागर, संस्कार संवर्धन, धर्मजागरण, सामाजिक एकात्मता, राष्ट्रभावना दृढ करणे, पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन, जलनीती, जलसाक्षरता आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय जीवनमूल्यांचा प्रसार करण्याचा व्यापक उद्देश या उपक्रमामागे असल्याचे आयोजकांनी सांगितले. यात्रा श्रीक्षेत्र तुळजापूर येथून प्रारंभ होऊन लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. प्रत्येक शहराचे सविस्तर वेळापत्रक स्थानिक स्तरावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. यासंदर्भात परमपूज्य श्री मकरंद महाराज यांनी दत्तभक्त, देवीभक्त आणि सर्व नागरिकांना यात्रेत सहभागी होऊन श्रद्धेनुसार जोगवा अर्पण करण्याचे आवाहन केले आहे. "ही यात्रा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेसाठी नसून विश्वकल्याणाच्या संकल्पासाठी आहे. गुरुभक्ती, शक्ती उपासना आणि समाजसेवा यांचा संगम असलेल्या या यात्रेत सहभागी होणे ही प्रत्येकासाठी आध्यात्मिक साधना आणि राष्ट्रसेवेची सुवर्णसंधी आहे," असे त्यांनी म्हटले. अधिक माहितीसाठी ९९२१९२५१८९ आणि ९४२०८४८१८९ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन गुरुतत्त्व प्रदीप परिवाराने केले आहे.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.