कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर तालुक्यात प्रस्तावित विमानतळाच्या उभारणीला महत्त्वाची गती मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी)च्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी देत आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश एमएडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर यांना दिले असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी स्वतः या प्रकल्पाचे पालकत्व स्वीकारत संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना कपूर यांना दिल्या आहेत. त्यामुळे तुळजापूर तालुक्यातील विमानतळाचा प्रस्तावाची आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. या प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी मित्र संस्थेचे उपाध्यक्ष तथा तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नुकतीच नवी दिल्ली येथे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीत विमानतळाच्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींवर सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे प्रकल्पाच्या व्यवहार्यता तपासणीला आणि पुढील प्रक्रियेला अधिक बळ मिळाले. प्रस्तावित विमानतळामुळे तुळजापूरसह पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, येरमला, कुंथलगिरी आणि तेर या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना नजीकचा हवाई संपर्क उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. परिणामी देशभरातील भाविकांना या तीर्थक्षेत्रांपर्यंत जलद आणि सुलभ प्रवास करता येईल. यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याबरोबरच हॉटेल व्यवसाय, वाहतूक, व्यापार, सेवा क्षेत्र आणि स्थानिक रोजगारनिर्मितीलाही नवे बळ मिळणार आहे. याचबरोबर तुळजापूर तालुक्यातील प्रस्तावित 'तारा' (टीएआरए) प्रकल्पालाही या विमानतळाचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आणि सुरत–चेन्नई व शक्तिपीठ ग्रीनफिल्ड द्रुतगती मार्गाने जोडलेल्या या भागाला हवाई संपर्काची जोड मिळाल्यास उद्योग, लॉजिस्टिक्स, गुंतवणूक, निर्यात आणि सेवा क्षेत्रासाठी हा परिसर अधिक सक्षम ठरेल. धार्मिक, औद्योगिक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला दीर्घकालीन दिशा व बळ देणारा प्रकल्प, मुख्यमंत्र्यांचे आभार : आमदार राणाजगजितसिंह पाटील हा प्रकल्प केवळ विमानतळ उभारण्यापुरता मर्यादित नसून मराठवाड्यातील धाराशिव, बीड व लातूर जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील धार्मिक, औद्योगिक, पर्यटन आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला दीर्घकालीन दिशा व मोठे बळ देणारा ठरेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत प्रचंड आशावादी वातावरण निर्माण झाले असल्याचे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ‘देवाभाऊंचे’ आभार मानले आहेत.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.