वडगाव काटी विविध सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी गुणवंत चुंगे

 


वडगाव काटी : वडगाव काटी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या नूतन चेअरमनपदी श्री. गुणवंत शिवाजीराव चुंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच व्हाईस चेअरमनपदी श्री. संतोष विश्वनाथ कापसे यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली.
निवडीनंतर नूतन चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे संचालक मंडळ तसेच उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. नूतन पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सोसायटीच्या माध्यमातून सभासद व शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी माजी सरपंच महादेव भोसले, गौरीशंकर कोडगिरे, सुधीर पाटील, पिंटू नरवडे, उमेश कापसे, सुखदेव चुंगे, विनोद कोडगिरे, परमेश्वर कापसे, आनंतराव म्हमाणे, शिवाजी सावळे, अमोल सावळे, अण्णा नरवडे, नेताजी भोसले, मारुती भोसले, ताजोद्दीन शेख, शुकूर शेख, आमिर पठाण यांच्यासह सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.