तुळजापूर : राजा कंपनी तरुण मंडळाच्या वतीने श्रीमंत राजयोगी पावणारा गणपतीची आरती उत्साहात संपन्न झाली. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तहसीलदार सौ. माया माने तसेच तुळजाभवानी मंदिराचे सहव्यवस्थापक श्री. नागेश शितोळे, श्री. अनुप दमाने व श्री. अनिल भोसले यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली. यावेळी राजा कंपनी तरुण मंडळाचे आधारस्तंभ सज्जनराव साळुंके, अध्यक्ष गोविंद पेंदे, उपाध्यक्ष मंगेश साळुंके, कोषाध्यक्ष हरीष साळुंके, सहकोषाध्यक्ष शुभम गाजरे, सचिव मारुती कने, सहसचिव कार्तिक जाधव यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
आरतीनंतर सौ. माया माने यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. मंदिराशी संबंधित काही अडचणी किंवा समस्या असल्यास त्या सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच आगामी नवरात्रोत्सवाच्या काळात सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही सौ. माया माने यांनी यावेळी नमूद केले. यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह भाविकांचीही उपस्थिती होती.
Ut wisi enim ad minim veniam, quis nostrud exerci tation ullamcorper suscipit lobortis nisl ut aliquip ex ea commodo consequat. Duis autem vel eum iriure dolor in hendrerit in vulputate velit esse molestie consequat.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Vivamus leo ante, consectetur sit amet vulputate vel, dapibus sit amet lectus. Etiam varius dui eget lorem elementum eget mattis sapien interdum. In hac habitasse platea dictumst.